अरेच्चा! परीक्षेत विचारले करीनाच्या मुलाचे नाव; शाळेला नोटीस

वृत्तसंस्था, खंडवा मध्य प्रदेशातील खंडवा येथील एका खासगी शाळेतील परीक्षेत करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव लिहिण्यास सांगण्यात आल्याने त्या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. खंडवा शहरातील अॅकेडमिक हाइट्स पब्लिक स्कूलमधील परीक्षेदरम्यान सामान्य ज्ञान विषयात सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना 'करीना कपूर अणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहा,' असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर पालक-शिक्षक संघाने आक्षेप घेत शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तसेच ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरही व्हायरल झाली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शिक्षण अधिकारी संजीव भालेराव यांनी शाळेला नोटीस बजावली आहे. 'देशहित आणि वैयक्तिक आयुष्यात उपयुक्त ठरतील असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले पाहिजेत. यासंदर्भात शाळेला नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे उत्तर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ,' असे भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, 'ही प्रश्नपत्रिका दिल्लीस्थित एका संस्थेकडून आली आहे. या संस्थेशी अमाच्या शाळेचा करार आहे. या प्रश्नाबाबत शाळेतील एकाही विद्यार्थ्याच्या पालकाने तक्रार केलेली नाही. जे लोक विरोध करत आहेत, त्यांची मुले आमच्या शाळेत शिकत नाहीत किंवा त्यांचा शाळेशी काहीही संबंध नाही,' असे स्पष्टीकरण शाळेच्या संचालिका श्वेता जैन यांनी दिले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32r4fin
via IFTTT

Post a Comment

0 Comments