शाळा बंद होणार का? दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडूत ओमिक्रॉनचे संक्रमण वाढले

School Update on : देशभरात सध्या संसर्गाचा धोका ( ) वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडूत या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी जर खबरदारी म्हणून निर्बंध आणले, तर त्याचा पहिला फटका राज्यातील शाळांना बसण्याची शक्यता आहे. राज्यात इयत्ता पहिली पासूनच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. देशात कोविड-१९ ओमिक्रॉन संसर्गाचा आकडा ३५० च्या पुढे गेला आहे. तूर्त तरी ही संख्या कमी असली तर या विषाणूचा प्रसाराचा वेग जास्त असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष या पार्श्वभूमीवर शाळांकडे असेल, कारण केवळ विद्यार्थीच अद्याप लसीकरणापासून वंचित आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार राज्य सरकार करू शकते असे संकेत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिले आहेत. सध्या देशातील ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तूर्त तरी राज्य सरकारने लागू केलेल्या SOP नुसार शाळा, महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने अंतिम निर्णय घ्यायचा आहे. त्यानुसार बहुतांश सर्व ठिकाणच्या शाळांमधील पहिलीपासूनचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत. पण अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा पर्याय निवडलेला आहे. राज्यांसाठी अलर्ट ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संकट गडद होऊ लागलं आहे. बुधवारी सव्वादोनशेच्या आत असलेली रुग्णसंख्या आज थेट साडेतीनशेपार पोहचली आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता ३५५ इतकी झाली असून महाराष्ट्रात आज एकाच दिवशी तब्बल २३ नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, लक्षात घेत केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3swCO16
via IFTTT

Post a Comment

0 Comments