Also visit www.atgnews.com
SSC CGL Exam 2022: स्टाफ सिलेक्शन भरती परीक्षा; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
SSC CGL Application 2022: कर्मचारी निवड आयोगाने (SSC)संयुक्त पदवी परीक्षा स्तरावरील भरतीसाठी म्हणजेच एसएससी सीजीएल २०२२ (SSC CGL 2022) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. एसएससी सीजीएल 2022 अर्ज ऑनलाइन पद्धतीने वर भरता येणार आहेत. इच्छुक उमेदवार ग्रुप बी आणि सी च्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. २३ जानेवारी २०२२ पर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत. एसएससी द्वारा जारी नोटिफिकेशननुसार, गॅझेटेड म्हणजेच राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांवरील भरतीसाठी एसएससी संयुक्त पदवी स्तर (Combined Graduate Level Exam, CGL)रिक्त पदांची घोषणा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. उमेदवारांना एसएससी सीजीएल अर्ज भरण्यापूर्वी एसएससी सीजीएल (SSC CGL 2022) पात्रतेचे निकष पाहावे लागतील. कारण पात्रता एसएससी सीजीएल पदांनुसार विविध प्रकारची असते. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२२ आहे. एसएससी सीजीएल परीक्षा २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, एसएससी सीजीएल सीबीटी (CBT) १ परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये आयोजित केली जाणार आहे. एसएससी सीजीएल सीबीटी २ (CBT 2) परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. महत्त्वाच्या तारखा एसएससी सीजीएल अधिसूचना २०२२ - २३ डिसेंबर २०२१ एसएससी सीजीएल अर्जांना सुरूवात - २३ डिसेंबर २०२१ (रात्री ११.३० वाजता) एसएससी सीजीएल २०२२ अर्जांची अंतिम मुदत- २३ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत) ऑनलाइन पद्धतीने एसएससी सीजीएल अर्जांचे शुल्क भरण्याती अंतिम मुदत - २५ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत) ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत - २६ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत) चलानच्या माध्यमातून शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत - २७ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत) अर्जातील दुरुस्ती - २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत) एसएससी सीजीएल 2022 टियर 1 परीक्षेची तारीख - एप्रिल २०२२ पुढील पद्धतीने भरा ऑनलाइन अर्ज (How to fill Application Form 2022) - अधिकृत वेबसाइट – ssc.nic.in वर जा. - नंतर होम पेजवर न्यू रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा. - वन टाइम नोंदणीसाठी आपले लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर सर्व विचारलेली माहिती भरा. - एसएससी सीजीएल अर्ज २०२२ भरण्यासाठी लॉगइन करा. - अर्जाचे शुल्क भरा. - एसएससी सीजीएल 2022 अर्जाचे अंतिम पानाने पीडीएफ फाइल स्वरुपात डाऊनलोड करून ठेवा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3muXzqu
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments