IGNOU पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ

IGNOU : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षेचा (PhD Exam) अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना आणखी एक संधी मिळणार आहे. पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार उमेदवार ३० डिसेंबरपर्यंत आपला फॉर्म सबमिट करू शकणार आहेत. यासोबतच उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत परीक्षेचे शुल्कही जमा करता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरला नाही ते आता ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.ननोंदणीनंतर उमेदवारांना १ जानेवारी ते ३ जानेवारी या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआयद्वारे २३ डिसेंबरपर्यंत नोंदणी शुल्क जमा करता येणार आहे. ही परीक्षा १८० मिनिटांची असणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. पात्रता यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संबंधित विषयात किमान ५५ टक्के गुण किंवा त्याच्या समकक्ष ग्रेड बी सह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. मुलाखत प्रवेश परीक्षेत किमान ५० टक्के गुण (एससी/एसटी/ओबीसी (नॉन क्रीमीलेयर)/अपंग व्यक्तींना ४५ टक्के गुण) मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निवडले जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांना संबंधित विषयानुसार डॉक्टरेट संशोधन समितीसमोर सिनॉप्सिस सादर करावा लागणार आहे. Phd Admission: अशी करा नोंदणी स्टेप १ : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा. स्टेप २: आता वेबसाइटवर दिलेल्या IGNOU Phd Admission लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता नवीन नोंदणीवर क्लिक करा आणि मागितलेली सर्व माहिती सबमिट करून तुमचे लॉगिन तयार करा. स्टेप ४: त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ५: आता तुमचा अर्ज भरा. स्टेप ६: फोटो अपलोड करा आणि सही करा. स्टेप ७: अर्ज फी भरा. स्टेप ८: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mOHfB5
via IFTTT

Post a Comment

0 Comments