Also visit www.atgnews.com
इंजिनीअरिंग पदवी प्रवेशाला मुदतवाढ मिळणार? शिक्षणमंत्र्यांचे संकेत
Admission: (engineering degree admission) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या प्रवेशाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. इंजिनीअरिंग पदवी प्रवेशाला मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. यातील सर्व बाबींचा विचार करता योग्य निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी केले आहे. आज या संदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना मंगळवारी ७ डिसेंबर रोजी प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, एसटी संप, ओमायक्रॉनचा धोका आदींमुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी संबंधित कॉलेजांमध्ये पोहोचता येत नसल्याने प्रवेश घेण्याला अल्प प्रतिसाद आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत प्रवेश घेण्याची सूचना देण्यात आली आहे. पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना ७ डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित न केल्यास, प्रवेश रद्द होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदत वाढ देऊन विद्यार्थी हिताचा विचार व्हावा अशी मागणी आज युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्य सामायिक परीक्षा कक्षाच्या आयुक्तांकडे केली आहे. यादव म्हणाले, राज्य सीईटी सेलमार्फत विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ नोव्हेंबर ते एक डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. यंदा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी एक लाख सात हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने, एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती कॉलेजांमध्ये पोहोचता येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली परिसरात 'ओमायक्रॉन'चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक द्विधा मनस्थितीत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी आणि विद्यार्थी हिताचा विचार व्हावा अशी विनंती केल्याचे देखील यादव यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xZcPjC
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments