Career in Digital Banking: डिजीटल बँकिंग म्हणजे काय? यात करिअर कसे कराल? जाणून घ्या..

in : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बँकाही अॅडव्हान्स झाल्या आहेत. डिजीटल बँकिंगने गेल्या काही वर्षांपासून या जगात आपला दर्जा प्रस्थापित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फिनिटी फोरममधील त्यांच्या अलीकडील भाषणात फिनटेक उद्योगाचे कौतुक करत म्हटले, डिजीटल बँका पुढील दशकात देशात सर्वसाधारण बाब असेल कारण लोकांमध्ये त्यांचा उपयोग वाढणार आहे. डिजीटल बँकिंगचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. ०८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीनंतर रोख व्यवहारात घट झाली आहे. डिजीटल बँकिंगच्या विस्तारासोबतच डिजीटल क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणीही वाढली आहे. यामुळे म्हणजे काय? आणि या क्षेत्रात करिअर कसे करता येईल? याबद्दल माहिती घेणार आहोत. डिजीटल बँकिंग म्हणजे काय? देशातील अनेक मोठ्या बँकांनी त्यांच्या डिजीटल बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI)सुविधा सुरू केली. गेल्या काही वर्षांत डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डिजीटल बँकिंगची कोणतीही प्रत्यक्षात शाखा नसते. यातील व्यवहार पूर्णपणे ऑनलाइन केवळ इंटरनेटद्वारे याचा वापरू शकता. हा डिजीटल बँकिंग आणि इतर बँकांमधील फरक आहे. डिजीटल बँकिंगमध्ये करिअर कसे करावे? तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कॉमर्समधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही बँकिंग आणि फायनान्सशी संबंधित कोणताही पदवी, डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करू शकता. दुसरीकडे, डिजीटल बँकिंगमध्ये करिअर करण्यासाठी अर्थशास्त्र, फायनान्स तसेच कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाचे ज्ञान असणेही खूप गरजेचे आहे. याशिवाय तुमच्याकडे संवाद कौशल्ये, इंटरपर्सनल स्किल्स, सेल्स प्रोसेस यांची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही तुमच्या ग्राहकांना प्रभावित करू शकाल. रोजगाराच्या संधी डिजीटल बँकिंगवर भर दिल्याने बँकांना वेबसाइट डिझाइन करण्यासाठी किंवा अॅप्स विकसित करण्यासाठी, डेटा अॅनालिस्ट करण्यासाठी आणि सायबर क्राइमचा भाग हाताळण्यासाठी मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामध्ये तज्ञ प्रोफेशनल्सची आवश्यकता असते. बहुतेक युजर्स ऑनलाइन बँकिंगचा वापर करतात. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या बँका त्यांच्या युजर्सना ऑनलाइन बँकिंगची सुविधा देत आहेत. याशिवाय फोन पे, पेटीएम-एम (पेटीएम), गुगल पे (गुगल पे), अॅमेझॉन पे असे काही ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्म देखील कार्यरत आहेत. ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन बँकिंग, डिजीटल पेमेंट, यूपीआय संबंधित काम करु शकता. तुम्हाला या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dxdyiT
via IFTTT

Post a Comment

0 Comments