Also visit www.atgnews.com
CTET साठी प्री-प्रवेशपत्र जाहीर, उमेदवारांना 'या' तारखेपर्यंत मिळेल मुख्य प्रवेशपत्र
Admit Card 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १६ डिसेंबरपासून होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) तात्पुरती प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत. ही परीक्षा १६ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार असून १३ जानेवारीपर्यंत असणार आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान परीक्षा होणाऱ्या उमेदवारांसाठी सीबीएसईने पूर्व प्रवेशपत्र जाहीर केले आहे. तसेच १ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र नंतर जाहीर केले जाणार आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षेची तारीख आणि शहर याबद्दल माहिती देण्यासाठी, तात्पुरते प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. तर मूळ प्रवेशपत्र परीक्षेच्या दोन दिवस आधी जाहीर केले जाणार आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र पाहता येणार आहे. या परीक्षेसाठी २ पेपर आयोजित करेल. पहिला पेपर १ आणि पेपर २ असेल. प्राथमिक इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत ज्यांना शिकवायचे आहे, अशा उमेदवारांसाठी पेपर १ आणि सहावी ते आठवीचे शिक्षक होण्यासाठी ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी पेपर २ असेल. सीटीईटी परीक्षा एकूण अडीच तास कालावधीची असेल. ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. केंद्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणार्या CTET 2021 या परीक्षेसाठी देशभरातील ३०० हून अधिक शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध केली जाणार आहेत. CTET २०२१ साठी अर्ज प्रक्रिया १९ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली होती आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२१ होती. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांचा शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना पेपर १ द्यावा लागेल, इयत्ता पहिली ते आठवीसाठी पेपर २ ची परीक्षा द्यावी लागेल. दोन्ही पेपरमध्ये १५० गुणांचे १५० प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा असेल आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने असेल. CTET पेपर १ उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवण्यास पात्र असतात. तर CTET पेपर २ उत्तीर्ण झालेले उमेदवार सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पात्र ठरतात. उमेदवारांना अधिकृत पोर्टलवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल. CTET Admit Card 2021: असे करा डाऊनलोड CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा. त्यानंतर होमपेजवरील 'CTET December Admit Card' लिंकवर क्लिक करा. तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा. ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dNj2G3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments