Also visit www.atgnews.com
Floriculture मध्ये करा करिअर; कोर्स, पात्रता आणि पगार सर्वकाही जाणून घ्या
career scope: फुलांचा सुगंध आणि सौंदर्य प्रत्येकाला त्यांच्याकडे आकर्षित करते. तुम्हाला देखील फुलांची आवड असेल आणि फुलशेतीचे क्षेत्रात करिअर करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आजकाल वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या सजावटीमध्ये रंगबेरंगी फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. गेल्या काही वर्षांत भेटवस्तू किंवा स्वागत-सन्मान म्हणून पुष्पगुच्छ देण्याची प्रथा झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे. भारतात फुलांचा व्यवसाय पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठा झाला आहे. साहजिकच आता फ्लोरिकल्चरमध्ये रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे करिअरच्या दृष्टीकोनातून या क्षेत्राकडे पाहणारी तरुणाई भरपूर कमाई करू शकते. फ्लोरिकल्चर म्हणजे काय? फ्लोरिकल्चर म्हणजे फलोत्पादन म्हणजेच फुलशेती. यामध्ये फुलांच्या रोपांचा अभ्यास केला जातो. ही फलोत्पादनाची एक शाखा आहे. ज्यामध्ये फुलांचे उत्पादन, निगा आणि विपणन याविषयी फुलांचा अभ्यास केला जातो. सामान्यतः, फ्लोरिकल्चर म्हणजे फुले आणि शोभेच्या वनस्पतींची लागवड करणे ज्याचा वापर कॉस्मेटिक आणि परफ्यूम उद्योगात तसेच फार्मास्युटिकल उद्योगात कच्चा माल म्हणून केला जाऊ शकतो. फ्लोरिकल्चर कोर्स आणि पात्रता या क्षेत्राची आवड असणाऱ्यांना बारावीनंतर करिअर करता येईल. व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि महाविद्यालये ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीसाठी फ्लोरिकल्चरमधील सर्टिफिकेट आणि डिप्लोमा अभ्यासक्रम देतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही फ्लोरिकल्चरिस्ट म्हणून तुमचे करिअर सुरू करू शकता. स्कोप मोठा असेल तर तुम्ही या क्षेत्रात पुढील अभ्यास सुरू ठेवू शकता. फ्लोरिकल्चरच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश घेतला जातो. काही संस्थामध्ये बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करते. पगार इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच, फ्लोरिकल्चरिस्टचा पगार त्याच्या कामाच्या आणि अनुभवाच्या आधारावर ठरवला जातो. करिअरच्या सुरुवातीला २ लाख ५० हजार ते ३ लाख ५० हजार पर्यंत पॅकेज उपलब्ध आहे. मध्यम स्तरावरील आणि ज्येष्ठांचे वार्षिक उत्पन्न ५ ते ६ लाख रुपये होते. या क्षेत्रातील वेतन जॉब प्रोफाइलवर अवलंबून असते. संशोधन आणि अध्यापनात असलेल्यांना सरकारी नियमांनुसार पगार मिळतो. स्वयंरोजगारातूनही चांगले पैसे मिळू शकतात. झेंडूच्या फुलांचे वार्षिक उत्पन्न हेक्टरी २ ते ३ लाख रुपये आहे. गुलाबाची वार्षिक लागवड प्रति हेक्टर ४ ते ६ लाखांपर्यंत असू शकते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JtkIDz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments