Also visit www.atgnews.com
UPSC NDA 2022: महिला उमेदवारांसाठी अशी असेल फिजिकल टेस्ट, जाणून घ्या
Female Physical Standard: यूपीएससी एनडीए २०२२ () भरतीमध्ये देखील सहभागी होऊ शकतात. या भरतीसाठी महिला उमेदवारांना लेखी परीक्षेसोबतच शारीरिक चाचणीमध्ये उत्रीर्ण होणे आवश्यक आहे. याचा सविस्तर तपशील जाहीर करण्यात आला आहे. यूपीएससी एनडीए २०२२ साठी नोंदणी प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरू झाली असून ११ जानेवारी २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. या अंतर्गत एकूण ४०० रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये ३५ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. ही परीक्षा १० एप्रिल रोजी होणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासोबतच शारीरिक निकषांची पूर्तता करणेही आवश्यक आहे. जर उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त नसेल तर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात निवड होऊ शकणार नाही. शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.. सशस्त्र दलात प्रवेशासाठी महिला उमेदवारांची किमान उंची १५२ सेमी असणे आवश्यक आहे. गोरखा आणि भारताच्या ईशान्येकडील प्रदेश, गढवाल आणि कुमाऊंमधील टेकड्यांमधील किमान १४८ सेमी उंचीचे उमेदवार स्वीकारले जातील. परीक्षेच्या वेळी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना उंचीमध्ये २ सेमी वाढीव सवलत दिली जाईल. फ्लाइंग ब्रँचसाठी किमान उंचीची आवश्यकता १६३ सेमी आहे. बॉडी मास इंडेक्स २५ च्या खाली असावा. कंबर ते हिप हे प्रमाण पुरुषांसाठी ०.९ आणि महिलांसाठी ०.८ पेक्षा कमी असावे. कंबर पुरुषांसाठी ९० सेमी आणि महिलांसाठी ८० सेमीपेक्षा कमी असावी. सर्व जैवरासायनिक चयापचय घटक सामान्य मर्यादेत असावेत. महिला उमेदवारांची तपासणी महिला वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञांकडून केली जाईल. जर ते उपलब्ध नसतील तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महिला परिचराच्या उपस्थितीत तपासणी केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EgXrAM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments