Also visit www.atgnews.com
मेडिकल परीक्षार्थींना यंदाही मिळणार 'कोव्हिड कवच'; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पुढे ढकलण्यात आलेल्या सर्व हिवाळी सत्राच्या परीक्षांसाठी यंदाही कोव्हिड सुरक्षा कवच योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा विद्यार्थ्यांना केंद्र बदलाची सुविधा मात्र मिळणार नसल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. पंधरा दिवसांपासून वाढत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, आरोग्य विद्यापीठामार्फत हिवाळी २०२१ सत्राच्या पदव्युत्तर, पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. जानेवारीमध्ये झालेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी, तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले. तसेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदा या परीक्षांसाठीही परीक्षार्थींच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत योजना लागू केल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. सर्व विद्यापीठे व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य आहे. मात्र, आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार नाही, असे आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या विविध केंद्रीय परिषदांमार्फत जाहीर केले. हा सर्व अभ्यासक्रम प्रात्यक्षिकाधारित असल्याने दीड वर्षांपासून कोव्हिड काळातही विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा कोव्हिड मार्गदर्शक नियमांसह परीक्षा केंद्रावर घेतल्या होत्या. यंदाही विद्यापीठाच्या हिवाळी २०२१ च्या सत्र परीक्षा केंद्रांवरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे कोव्हिडचा प्रादुर्भाव लक्षात घेत, ही योजना यंदाही लागू करण्यात आली आहे. केंद्र बदलाची सुविधा नाही गेल्या वर्षी आरोग्य विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलाची सुविधा दिली होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तव्याजवळ किंवा त्यांचेच महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडता आले होते. यंदा मात्र गेल्या दोन लाटांच्या तुलनेत कोव्हिडची तीव्रता कमी असल्याने ही सुविधा दिली जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. ...असा मिळणार लाभ - परीक्षेदरम्यान आजारी झाल्यास परीक्षार्थीस उपचारासाठी एक लाख रुपये - विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची मदत
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3K3Ro6L
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments