एमपीएससी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे () घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ आणि दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२१ या परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या परीक्षांसाठी अनुक्रमे १५ जानेवारी आणि १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. एमपीएससीने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ चा अर्ज भरण्यासाठी ११ जानेवारी आणि दिवाणी न्यायाधीश पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १५ जानेवारीची मुदत दिली होती. मात्र, आता अर्ज भरणे आणि चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील अटी आणि शर्तींमध्ये बदल नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. या बाबत अधिक माहिती एमपीएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागात एमपीएससीद्वारे ५४७ पदांची भरती दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट अ या संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण ५४७ पदांसाठी ही भरती होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r4VrqK
via IFTTT

Post a Comment

0 Comments