Also visit www.atgnews.com
करोनामुळे शाळा बंद ठेवणे तर्कहीन; जागतिक बँकेच्या शिक्षण संचालकांचे सांगणे
वृत्तसंस्था, नवी दिल्ली करोना आपत्तीच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या काळात शाळा बंद करण्याच्या निर्णयाला आता चौफेर विरोध होत असतानाच जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनीही त्याला पूरक अशी भूमिका मांडली आहे. करोना काळामध्ये शाळा बंद ठेवणे तर्कहीन असून त्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. आता नवीन लाट आली तरी शाळा बंद करणे हा शेवटचा पर्याय असायला हवा, असे मत जागतिक बँकेचे शिक्षण संचालक जेम सावेद्र यांनी मांडले. करोना संकटाचा शिक्षण क्षेत्रावर झालेल्या परिणामांचा ते अभ्यास करत आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे करोना संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली किंवा शाळा सुरक्षित ठिकाण ठरत नाही, अशी कोणतीही उदाहरणे आढळली नाहीत. मुलांचे लसीकरण होईपर्यंत वाट पाहायला हवी, या भूमिकेलाही कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे मांडले. करोना संसर्गातील वाढ आणि शाळा सुरू असणे याचा कोणताही परस्पर संबंध नाही. या दोन गोष्टींचा परस्पर संबंध आहे किंवा त्याचे समर्थन करता येईल, असे कोणतेही पुरावे आढळले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळेच आता करोनाची नवी लाट आली तरी शाळा बंद करणे हा शेवटचा पर्याय असावा. रेस्टॉरंट, बार, शॉपिंग मॉल सुरू असतात आणि शाळा बंद राहतात, हे तर्कहीन असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात परिस्थिती चाचपडल्यासारखी होती. या साथीशी दोन हात करण्याचे सर्वोत्तम मार्ग माहिती नव्हते. त्यामुळेच शाळा बंद करणे ही जगाची तात्कालिक प्रतिक्रिया होती. आता बराच काळ निघून गेला आहे. आपल्याकडे अनुभव आणि पुरावे आहेत. त्यामुळे त्याचा आधार घेऊन शाळांबाबत निर्णय अपेक्षित आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. संसर्ग वाढीमध्ये शाळांचा कुठलाही संदर्भ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fyEgZn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments