Also visit www.atgnews.com
IBPS तर्फे परीक्षेचे कॅलेंडर जाहीर, कोणती परीक्षा कधी होणार हे जाणून घ्या
IBPS Calendar 2022-23: इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) च्या माध्यमातून २०२२-२३ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. हे कॅलेंडर आयबीपीएसची अधिकृत वेबसाइटवर १६ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. २०२२ मध्ये IBPS क्लर्क आणि पीओ परीक्षा कधी होणार? आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल? याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. बँक परीक्षेची तयारी करणारे आणि या परीक्षेला बसलेले उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या नोटिफिकेशनमधील संपूर्ण तपशील तपासू शकतात. यावेळी IBPS परीक्षा कॅलेंडर () मध्ये परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. आयबीपीएस ( Date Sheet 2022) द्वारे जाहीर केलेल्या कॅलेंडर अंतर्गत आरआरबी, पीओ, क्लर्क, एसओ (RRB, PO, Clerk, SO) सारख्या सर्व प्रमुख परीक्षांच्या तात्पुरत्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखांमध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. याचा तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. या नियमांमध्ये बदल यावेळी आयबीपीएस परीक्षा कॅलेंडरमध्ये परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेत (IBPS Exams Details) बदल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी 'सिंगल रजिस्ट्रेशन' केले जाईल. विविध रिक्त पदांसाठी भरती तपशील योग्य वेळी जाहीर केले जाणार आहेत. मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नसल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कॅलेंडर असे करा डाउनलोड कॅलेंडर डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर, RRBs आणि PSBs साठी ऑनलाइन CRP च्या तात्पुरत्या कॅलेंडरवर क्लिक करा. आता ऑनलाइन मुख्य परीक्षा कॅलेंडर २०२२-२३ च्या लिंकवर जा. येथे ऑनलाइन तात्पुरत्या कॅलेंडरच्या लिंकवर क्लिक करा. तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका. परीक्षेच्या तारखा ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल I प्राथमिक परीक्षा- ७,१३,१४,२० आणि २१ ऑगस्ट २०२२ ऑफिसर्स स्केल II आणि III एकल परीक्षा- २४ सप्टेंबर २०२२ ऑफिसर्स स्केल I मुख्य परीक्षा- २४ सप्टेंबर २०२२ ऑफिस असिस्टंट मुख्य परीक्षा- ०१ ऑक्टोबर २०२२ प्रोबेशन ऑफिसर (PO) प्राथमिक परीक्षा- १५,१६ आणि २२ ऑक्टोबर २०२२ मुख्य परीक्षा- २६ नोव्हेंबर २०२२ विशेषज्ञ अधिकारी (SO) प्राथमिक परीक्षा- २४ आणि ३१ डिसेंबर २०२२ मुख्य परीक्षा- २९ जानेवारी २०२३ परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये परीक्षेच्या तारखांच्या तपशिलाव्यतिरिक्त, काही महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. तसेच सर्व उमेदवारांनी अर्ज भरताना फोटो, सही, अंगठ्याचा ठसा व्यवस्थित भरला जाईल याची काळजी घ्यावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3I2uxGW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments