IGNOU MBA अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

MBA Admissions 2022: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जानेवारी २०२२ सत्राच्या मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. इग्नू जानेवारी २०२२ एमबीए अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज शुल्क जमा करता येणार आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाचा ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. इग्नूने हा अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून सुरू केला आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमला जानेवारीपासून सुरुवात होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाढत्या जबाबदारीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. नोकरी-व्यवसायामुळे अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना इग्नूने सुरु केलेल्या ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमाचा फायदा घेता येणार आहे. ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना पदवी परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४५ टक्के गुणांसह कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय थेट प्रवेश घेता येईल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इग्नूची अधिकृत वेबसाइट ignuiop.samarth.edu.in वर जा. उमेदवारांना ५ वेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येणार आहे. ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट(Human Resource Management),फायनान्शियल मॅनेजमेंट (Financial Management), मार्केटींग मॅनेजमेंट (Marketing Management), ऑपरेशन्स मॅनेजमेंट (Operations Management), सर्व्हिस मॅनेजमेंट (Services Management)या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. इग्नूतर्फे एकूण २८ अभ्यासक्रम चार सेमिस्टरमध्ये पूर्ण केले जाणार आहेत. जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार एमबीए ऑनलाइन प्रोग्रामसाठी अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती डिजिटली काऊन्सेलिंग, मोबाइल अॅप, ई-मेल यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे दिली जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेतला जाणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून कमाल कालावधी चार वर्षांचा आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महागड्या फीमुळे कोर्स करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोर्सचा लाभ घेता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IIuWOY
via IFTTT

Post a Comment

0 Comments