Also visit www.atgnews.com
पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार
Pune :पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये लसीकरण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर आता पुण्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. राज्य सरकारने शाळा आणि कॉलेज सुरु केले असले तरी अंतिम निर्णय पालकांनीच घ्यायचा आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. पहिली ते आठवीपर्यंत शाळा अर्धा दिवस म्हणजे ४ तास असणार आहे. म्हणजे दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी जाऊन डबा खाऊ शकतील. नववीपासून पुढील वर्ग पूर्ण वेळ भरतील अशी माहिती देण्यात आली आहे. एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील. त्यानंतर आढावा घेतला जाईल. जर करोना रुग्णसंख्या कमी राहिली तर पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा देखील पूर्णवेळ सुरु राहतील असे अजित पवार म्हणाले. १ फेब्रुवारीला शाळा सुरु होण्यापुर्वी ३० आणि ३१ जानेवारीदरम्यान शाळांमधील स्वच्छता आणि इतर बाबी शाळा प्रशासनातर्फे पाहिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र मास्कमुक्त होणार अशी चर्चा रंगत आहे. पण मंत्रिमंडळ बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्रबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. शाळा आणि कॉलेज सुरु होणार असले तरी विद्यार्थ्यांनी मास्क घालणे आवश्यक असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://bit.ly/3uapd0z
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments