कॉलेजांचा भार 'प्रभारीं'वर! मुंबई विद्यापीठाशी संलग्न १७८ कॉलेज प्राचार्यांविना

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई उच्च शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रत्येक कॉलेजांतील प्राचार्यांची पदे भरण्याचे आदेश मागील काही महिन्यांपूर्वीच उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. असे असतानाही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या तब्बल १७८ कॉलेजांमध्ये अद्यापही प्राचार्याविना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक स्वायत्त आणि विनाअनुदानित कॉलेजांची संख्या जास्त आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ८०८ महाविद्यालयांपैकी ८१ कॉलेजांमध्ये प्राचार्यांचा कार्यभार हा संचालक पद निर्माण करून त्यांच्यामार्फंत सुरू आहे. त्यातील अनेक कॉलेजे ही स्वायत्त आहेत. ७२७ पैकी १७८ कॉलेजे प्राचार्यविना सुरू असून त्यामध्ये सर्वाधिक कॉलेजे ही विनाअनुदानित आणि स्वायत्त झालेली असल्याचेही समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहितीत, मुंबई विद्यापीठाच्या अभिलेख्यात तब्बल २३ कॉलेजांची माहितीच उपलब्ध नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ज्या कॉलेजांत प्राचार्यासारखे महत्त्वाचे पद रिक्त आहे किंवा प्रभारीच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामध्ये प्रामुख्याने नामांकित कॉलेजांचा समावेश आहे. यात के. जे, सोमय्या, ठाकूर एज्युकेशनल ट्रस्ट, शहीद कलानी मेमोरियल ट्रस्ट, तलरेजा, वर्तक, बॉम्बे फ्लॅइंग क्लब, रामजी असार, गुरुनानक विद्यक भांडुप, शेठ एनकेटीटी, जितेंद्र चौहान, मंजरा, रिझवी, अकबर पिरभोय, संघवी, विवेकानंद, विलेपार्ले केलवानी, बॉम्बे बंट्स, आरआर एज्युकेशन, एचआर, अंजुमन इस्लाम यासारख्या कॉलेजांचा समावेश आहे. दरम्यान, प्राचार्यांची पदे भरण्याचे आदेश असतानाही ती न भरणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करावी अशी मागणीही गलगली यांनी केली आहे. तर ज्या कॉलेजांना नवीन अभ्यासक्रम आणि त्यासाठीची मान्यता दिली जाते, त्यांना मान्यता देऊ नये अशी मागणीही गलगली यांनी केली आहे. केवळ चर्चेचे गुऱ्हाळ प्राचार्यांच्या रिक्त पदांबाबत दरवर्षी विद्यापीठाच्या अधिसभेत चर्चा रंगते. यावर विद्यापीठ प्रशासन सरकारकडे बोट दाखविते. तर सरकार प्रशासनाकडून माहिती येत नसल्याचे सांगते. यामुळे प्राचार्यांची नियुक्ती रखडत आहे. याबाबत सरकारनेच ठोस भूमिका घेऊन आदेश द्यावेत, अशी मागणी प्राध्यापक संघटनांनीही केली आहे. वेतन तुटपुंजे विनाअनुदानित कॉलेजांमध्ये प्राचार्य पदासाठी दिले जाणारे वेतन हे तुटपुंजे असते आणि त्यामानाने काम खूप जास्त असते. या कारणास्तव अनेक प्राध्यापक योग्यता असूनही हे पद स्वीकारण्यास तयार होत नाहीत. यावरही काही तरी तोडगा काढणे आवश्यक आहे, असेही म्हणणे संघटनांनी मांडले आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A7lt0P
via IFTTT

Post a Comment

0 Comments