Also visit www.atgnews.com
GATE 2022 परीक्षा स्थगित करा; उमेदवारांची सोशल मिडीयाद्वारे मागणी
ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग () परीक्षेचे आयोजन आयआयटी खडगपूर द्वारे ५ ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी गेट अॅडमिट कार्ड जारी करण्याचा ३ जानेवारीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या संचालकांनी सांगितले की गेट परीक्षेचे आयोजन करायचे वा परीक्षा स्थगित करायची याबाबत संबंधित संस्थांशी चर्चा सुरू आहे. पण या दरम्यान उमेदवारांद्वारे परीक्षा स्थगित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट (GATE)एक अशी परीक्षा आहे जिच्या माध्यमातून मुख्यत्वे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे मास्टर्स प्रोग्राम आणि भरतीत प्रवेशांसाठी इंजिनीअरिंग आणि विज्ञानातील विविध पदवी विषयांच्या व्यापक ज्ञानाचे परीक्षण ले जाते. साठी अर्ज करणारे अनेक उमेदवार सोशल मिडीयाद्वारे कोविड १९ महामारीच्या वाढत्या प्रसारामुळे परीक्षा स्थगित करण्याची मागणी करत आहेत. परीक्षा स्थगित करण्यासह उमेदवार परीक्षा केंद्र शहर बदलण्याची संधी मिळावी, अशीही मागणी करत आहेत. कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निर्बंधांमुळे अनेक उमेदवार परीक्षा केंद्राच्या शहरापासून लांब आहेत, त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याचा पर्याय दिला जावा, अशी मागणी होत आहे. गेट २०२२ अॅडमिट कार्ड आयआयटी खडगपूर द्वारे गेट २०२२ अॅडमिट कार्ड ३ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार होते, नंतर ते ७ जानेवारी रोजी जाहीर होणार होते. ते पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3I4UV2R
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments