NEET UG काऊन्सेलिंगसाठी 'ही' महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा

NEET : वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, अंडरग्रेजुएट (NEET UG) 2021 चे काऊन्सेलिंग वेळापत्रक जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणामुळे नीट यूजी २०२१ काऊन्सेलिंगसाठी उशीर झाला. काऊन्सेलिंग सुरू होणार असल्याने उमेदवारांनी आपली कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. आवश्यक कागदपत्रांची यादी येथे देण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईटवरही माहिती उपलब्ध आहे. नीट यूजी काऊन्सेलिंगसाठी नोंदणी फक्त ऑनलाइन असेल. नीट यूजी काऊन्सेलिंगची नोंदणी ऑनलाइन केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ऑफलाइन अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांना नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ ला ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नीट यूजीमध्ये राज्य कोट्याअंतर्गत एकूण १९२ वैद्यकीय महाविद्यालये २३,३७८ एमबीबीएसच्या जागा दिल्या जात आहेत. त्याचवेळी २७२ सरकारी महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या एमबीबीएसच्या एकूण जागांची संख्या ४१,३८८ इतकी आहे. एमबीबीएससाठी ८३,०७५, बीडीएससाठी २६,९४९, आयुषसाठी ५२,७२०, बीवीएससी आणि एएचसाठी ६०३, एम्ससाठी १,८९९ आणि जिपमरसाठी २४९ आहे. काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती एमसीसीच्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर दिली जाणार आहे. २०२१ ला विलंब नीट काऊन्सेलिंग २०२१ ला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर काऊन्सेलिंगमधील अडथळे जवळपास दूर झाले आहेत. नंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नीट पीजी काऊन्सेलिंगच्या तारखेची घोषणा केल्याने अर्जदारांना दिलासा मिळाला. नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे एनटीए नीट स्कोअर रँकसह नीट २०२१ स्कोअर कार्ड एनटीए नीट २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना वयाच्या पुराव्यासाठी, जन्म प्रमाणपत्र किंवा इयत्ता दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षेसाठी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची उत्तीर्ण मार्कशीट आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. सारखे कोणतेही वैध फोटो आयडी पुरावा ८ ते १० पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र आणि पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3KaC5Jx
via IFTTT

Post a Comment

0 Comments