Also visit www.atgnews.com
NEET UG काऊन्सेलिंग १९ जानेवारीपासून सुरु होणार
NEET UG Counseling 2021: वैद्यकीय यूजी प्रवेश २०२१ साठी नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. नीट यूजीचे काऊन्सेलिंग १९ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. मेडिकल काऊन्सेलिंग कमेटी (MCC) पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ टक्के ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांसाठी ऑनलाइन ऑनलाइन काऊन्सेलिंग करेल. अर्जदार एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात. चॉइस फिलिंग आणि सीट अलॉकेशन संबंधित माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. नीट यूजीमध्ये राज्य कोट्याअंतर्गत एकूण १९२ वैद्यकीय महाविद्यालये २३,३७८ एमबीबीएसच्या जागा दिल्या जात आहेत. त्याचवेळी २७२ सरकारी महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या एमबीबीएसच्या एकूण जागांची संख्या ४१,३८८ इतकी आहे. एमबीबीएससाठी ८३,०७५, बीडीएससाठी २६,९४९, आयुषसाठी ५२,७२०, बीवीएससी आणि एएचसाठी ६०३, एम्ससाठी १,८९९ आणि जिपमरसाठी २४९ आहे. काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती एमसीसीच्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर दिली जाणार आहे. २०२१ ला विलंब नीट काऊन्सेलिंग २०२१ ला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर काऊन्सेलिंगमधील अडथळे जवळपास दूर झाले आहेत. नंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नीट पीजी काऊन्सेलिंगच्या तारखेची घोषणा केल्याने अर्जदारांना दिलासा मिळाला. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी जागा एकूण १९२ सरकारी महाविद्यालये असून एमबीबीएस कोर्ससाठी ४१२९ एआयक्यू जागा (AIQ seats) दिल्या जातात. ज्या सर्व राज्यांद्वारे ऑफर केलेल्या एकूण जागांच्या १५ टक्के आहे. उमेदवारांना या AIQ जागांवर MCC द्वारे प्रवेश मिळतो आणि उर्वरित ८५ टक्के राज्य कोट्यातील जागांसाठी, राज्ये काऊन्सेलिंग प्रक्रिया आयोजित करतात आणि त्यांचे संबंधित पात्रता निकष असतात. नीट पीजी काऊन्सेलिंग सुरु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पीजी समुपदेशनाची तारीख (NEET PG Counselling Date) जाहीर केली आहे. नीट पीजी काऊन्सेलिंग १२ जानेवारीपासून सुरू झाले आहे. यावेळी नीट पीजीच्या जागांसाठी एआयक्यू राउंड १, एआयक्यू राउंड २, एआयक्यू मॉप अप आणि एआयक्यू स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड चार फेऱ्यांमध्ये काऊन्सेलिंग केले जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fm3zxs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments