Also visit www.atgnews.com
HSC Exam 2022: बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. बारावीच्या परीक्षेतीली अर्धमागधी (१६) या विषयाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अर्धमागधी (१६) विषयाची परीक्षा ७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार होती. हा पेपर आता सुधारित वेळेनुसार, ८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे. बारावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GqcKcp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments