Also visit www.atgnews.com
UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील
ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्राथमिक म्हणजेच पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा म्हणजेच दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल. निवड निकष उमेदवारांनी इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/टप्पा-१) परीक्षा आणि इंजिनीअरिंग सेवा (मुख्य/टप्पा-२) परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र जारी केले जाईल. जे उमेदवारांना वेबसाइटला भेट देऊन डाउनलोड करावे लागेल. यासोबतच परीक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या काळात घेण्यात येत असलेली परीक्षा अत्यंत सावधगिरीने घेतली जाईल. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग सारख्या नियमांचे पालन करावे लागेल. परीक्षेस्थळी मोबाईल फोन/पेजरसह कोणतीही प्रतिबंधित वस्तू आणू नये अशी सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fUPjMB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments