Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाचे बीए सत्र ५ सह अन्य १६ परीक्षांचे निकाल जाहीर
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या () हिवाळी सत्राच्या पारंपारिक मानव्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र ५ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९३.३९ टक्के लागला आहे. विद्यापीठाने मंगळवारी विविध परीक्षांचे एकूण १६ निकाल जाहीर केले आहेत. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. बीए सत्र ५ या परीक्षेत एकूण १३ हजार ८७१ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १४ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ८५२ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ९१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ९८१ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://ift.tt/zEfU2lH यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. १६ परीक्षांचे निकाल जाहीर विद्यापीठाने मंगळवारी ८ फेब्रुवारीला हिवाळी सत्राचे तृतीय वर्ष बीए सत्र ५ समवेत बीए सत्र ५ व ६ (६०:४०), बीकॉम फायनान्शियल मार्केट सत्र ५ व ६ (७५ : २५ ), बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स सत्र ५ व ६ ( ६०: ४० ते ७५ : २५ ), बीए सत्र ५ (७५:२५), तृतीय वर्ष एमएफएम सत्र २, बीकॉम सत्र ६, एमएमएस सत्र ३, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट सत्र ४, पाच वर्षीय विधी सत्र ९ व १०, तृतीय वर्ष एमएमएम सत्र २ व बीए सत्र ६ (७५ : २५ ) असे एकूण सोळा निकाल जाहीर केले आहेत. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने १३५ निकाल जाहीर केले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XgPGzO0
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments