UGC NET परीक्षेचा निकाल कधी? NTA कडून महत्वाची अपडेट

NET Result: यूजीसी नेट परीक्षेत () बसलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, ) ने नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जेआरएफ आणि लेक्चरशिपसाठी उमेदवारांची पात्रता निर्धारित करण्यात येते. याअनुशंगाने राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) च्या डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सत्रांचे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीएकडून १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत यूजीसी नेट निकाल जाहीर केला जाऊ शकतो. एजन्सीने अद्याप यूजीसी नेट परीक्षेच्या निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी उमेदवारांनी परीक्षा पोर्टल ugcnet.nta.nic.in वर वेळोवेळी भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सत्र परीक्षा एनटीएने महामारीमुळे विलंबाने आयोजित केल्या होत्या. एजन्सीने २० नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत दोन्ही सत्रांच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेतल्या होत्या. 2022 : असा पाहा निकाल UGC NET डिसेंबर २०२० किंवा जून २०२१ परीक्षांसाठी अर्ज केलेले उमेदवार NTA द्वारे विविध तारखांना घेतलेल्या परीक्षांमध्ये बसले होते. या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic वर यूजीसी नेट निकाल २०२२ पाहता येणार आहे.यासाठी NTA द्वारे पोर्टलवर सक्रिय करण्यात येणाऱ्या लिंकवर क्लिक करावे लागेल. नवीन पेजवर तपशील (रोल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक इ.) भरुन सबमिट करा. त्यानंतर उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. एनटीएकडून मिळेल प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय पात्रता चाचणी प्रमाणपत्र जारी केले जाईल. उमेदवार विविध ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) किंवा विद्यापीठे किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त पदांसाठी त्यांच्या संबंधित विषयातील यूजीसी नेट प्रमाणपत्राद्वारे अर्ज करू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/YZbuLDg
via IFTTT

Post a Comment

0 Comments