ICSE टर्म १ निकालावर असमाधानी असाल तर 'येथे' करा री-चेकसाठी अर्ज

CISCE Term 1 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेश (CISCE) ने ICSE तसेच ISC म्हणजेच अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या सत्र १ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.org वर निकाल पाहता येणार आहे. या निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने कॉपी री-चेकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. CISCE ने कॉपी रीचेकींग अर्जाची प्रक्रिया सोमवारी निकालासोबत जाहीर केली आहे. निकालावर समाधानी नसलेले विद्यार्थी ISCE ची अधिकृत वेबसाइट cisce.org वर लॉग इन करून अर्ज करू शकतात. CISCE टर्म १ निकाल २०२२: रिचेकींगसाठी अर्ज शुल्क कॉपी री-चेकची सुविधा मोफत नसेल हे सीआयएससीईने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना प्रति विषय प्रती १००० रुपये द्यावे लागतील. दहावी आणि बारावीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क समान आहे. हे शुल्क परत केले जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये काही बदल झाल्यास त्यांना नवीन स्कोअरकार्ड दिले जाणार आहे. CISCE टर्म १ निकाल २०२२: रिचेकींगसाठी असा करा अर्ज खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी कॉपी री-चेकसाठी अर्ज करू शकतात. स्टेप १) विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा. स्टेप २) होपमेपजवर दहावी किंवा बारावी परीक्षेच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३) तुमचा आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ४) आता तुमच्या समोर विषयांची यादी येईल. स्टेप ५) यातून तुम्हाला ज्या विषयांवर आक्षेप घ्यायचा आहे ते निवडा. स्टेप ६) आता अर्ज शुल्क भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. स्टेप ७) अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट आउट घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TbVARx5
via IFTTT

Post a Comment

0 Comments