इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार

ECL : ( Limited) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. ईसीएल मायनिंग (Eastern Coalfields Recruitment) सरदार भरतीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या पदाच्या एकूण ३१३ जागा भरण्यात येणार आहेत. मायनिंग सरदार पदाच्या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. २० फेब्रुवारी २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. एकूण ३१३ रिक्त जागांपैकी खुल्या गटासाठी १२७, ईडब्ल्यूएसाठी ३०, ओबीसीसाठी ८३, एससीसाठी ४६, एसटी (सीटी) साठी २३ जागा रिक्त आहेत. ईसीएल भरती २०२२ ची छोटी सूचना ११ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झाली. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, डीजीएमएसने जारी केलेले मायनिंग सरदारशिपचे वैध प्रमाणपत्र असावे. तसेच, गॅस चाचणीचे वैध प्रमाणपत्र आणि वैध प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित माहितीसाठी, अधिसूचना पहा. ECL Recruitment: असा करा अर्ज या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट easterncoal.gov.in वर जा. होमपेजवर असलेल्या रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा. मायनिंग सरदार पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. अर्जामध्ये मागितलेली माहिती भरा. माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा. पगार ईसीएल भरती २०२२ अंतर्गत मायनिंग सरदारच्या पदांवर निवड झालेल्या तरुणांना दरमहा सुमारे ३१ हजार ८५२ रुपये पगार मिळेल. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अंतिम तारीख उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट easterncoal.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. ईसीएल भरती २०२२ साठी अर्ज प्रक्रिया १० मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/e7JYLEu
via IFTTT

Post a Comment

0 Comments