मराठवाड विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत तांत्रिक अडचणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांना लॉगीन, पासवर्डच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांची धांदल उडाली. तांत्रिक अडचणी लक्षात घेत विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. मात्र, अनेकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होत नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दोन सत्रात झालेल्या परीक्षेत मंगळवारी ४६ हजार २९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २४ हजार ३३५ विद्यार्थी अनुपस्थित होते. करोनामुळे फेब्रुवारी-मार्चसत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइन होत आहेत. विद्यापीठाची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. बी.ए, बीएससी, बीएसडब्लू, बी.कॉम अशा विविध अभ्यासक्रमांच्या विषयांची ऑनलाइन परीक्षा सुरू झाली. पहिल्या टप्प्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पेपर आहेत. विद्यापीठ परीसर विभाग, उप-परिसर, संतपीठ आणि संलग्नीत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मंडळाने विविध सुचना दिल्या होत्या. ऑनलाइन परीक्षा होत असल्याने सराव परीक्षा घेण्यात आली. सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात परीक्षा होत आहे. पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षा सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशा दोन सत्रांत घेतल्या जात आहेत. सकाळच्या सत्रात काही तांत्रिक अडचणी आल्याचे सांगण्यात येते. ऑनलाइन परीक्षेत लॉगीन होत असताना पासवर्ड स्वीकारत नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी समन्वयक, परीक्षा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तांत्रिक अडचणीबाबत परीक्षा समन्वयकांनी सांगितले की, बी.ए इंग्रजी विषयातील सकाळच्या सञातील अर्ध्या तासाच्या तांञिक समस्या वगळता इतर समस्या परीक्षार्थींना जाणवल्या नाहीत. परीक्षेच्या पासवर्डमध्ये बदल केल्यामुळे मोठ्या चूका परीक्षार्थींकडून टळल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. या विषयाचे होते पेपर.. पहिल्या दिवशी बी.ए, बीएससी, बीएसडब्लू अभ्यासक्रमातील तीसऱ्या आणि चौथ्या सञातील इंग्रजी विषयाचा पेपर होता. बी.कॉम अभ्यासक्रमातील तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांतील मराठी, हींदी, उर्दू, अरब, पाली आणि इंग्रजी विषयांचे पेपर होते. बीएस्सी अभ्यासक्रमातील अंतिम सत्रातील सॉफ्टवेअर क्वालिटी अॅण्ड टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर इंजिनीयर या विषयांचे पेपर झाले. ऑनलाइन परीक्षार्थी परीक्षेचे सत्र नोंदणीकृत विद्यार्थी उपस्थिती अनुपस्थिती १० वाजता -- ५९,२६० -- ३७,३५० -- २१,९१० २ वाजता -- ११,३३४ -- ८,९०९ -- २,४२५


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ye3L05P
via IFTTT

Post a Comment

0 Comments