Also visit www.atgnews.com
टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी गणेशन स्वतःहून पुणे पोलिसांसमोर हजर
पुणे: गैरव्यवहार () प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळवारी पुणे पोलिसांपुढे स्वत:हून हजर झाला. गणेशन याला बेंगळूरू न्यायालयानं २५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळं तूर्त त्याची अटक टळली आहे. प्रकरणात याआधी जी. ए. सॉफ्टवेअरच्या प्रितीश देशमुख व अश्विनकुमार याला अटक झाली आहे. अश्विन कुमार याच्याकडून १ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता आणि याच तपासात सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन सुद्धा सामील असल्याचे समोर आले आहे. वाचा: गणेशन याला तपासासाठी हजर राहण्यासाठी मेलद्वारे नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यास गणेशन यानं काहीही उत्तर दिलं नव्हतं. मधल्या काळात आरोपी व अधिकारी वर्गातील अनेकांना करोना संसर्ग झाल्यामुळे तपासाचं काम मंदावलं होतं. मात्र, आता पुणे पोलीस व सायबर विभागातर्फे तपासकामाला वेग मिळाला आहे. गणेशन हा स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झाला आहे. त्यामुळं आता या प्रकरणात बरीच माहिती पुढं येण्याची शक्यता आहे. वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HfIrZb7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments