CA इंटरमिडिएट डिसेंबर परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या अपडेट

ICAI Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ ची उमेदवारांकडून वाट पाहिली जात आहेत. बोर्डाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. दरम्यान सीए इंटरमीडिएट डिसेंबरच्या परीक्षेचा निकाल २६ फेब्रुवारी किंवा २७ फेब्रुवारीला जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाइट icai.org वर यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने यासंदर्भात ट्विट देखील करण्यात आले आहे. त्यानुसार २६ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर केले जातील. जर २६ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले नाहीत तर ते २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील. उमेदवारांनी या अधिकृत तारखा लक्षात ठेवाव्यात. सीए निकालांसंबंधी अधिक अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे. आयसीएआयद्वारे अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन देखील अपडेट दिली जाईल असे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सीए इंटरमिजिएट निकाल २०२१ ची वाट पाहत असलेले उमेदवार ईमेलद्वारे आयसीएआय डिसेंबरचा निकाल पाहू शकतात. संस्थेतर्फे अधिकृत नोटीसमध्ये नोंदणीकृत ईमेल आयडीवर सीए निकाल आणि स्कोअरकार्ड पाहण्याच्या सुविधेबद्दल माहिती देण्यात आली आहे. आयसीएआयकडून ट्विटरवर माहिती सीए इंटरचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाणार आहे. निकाल तपासण्यासाठी, रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन नंबर भरावा. आयसीएआय सीए इंटर निकाल २०२१ ची तारीख यापूर्वी आयसीएआयचे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी जाहीर केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी सीए इंटरमिजिएटच्या निकालाची तारीख केवळ तात्पुरती असल्याचे स्पष्ट केले होते. आयसीएआय सीए निकाल २०२१ जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना त्यांनी मिळवलेले विषयवार गुण, रँक, पात्रता आणि इतर तपशील पाहता येणार आहे. डिसेंबर २०२१ च्या कालावधीसाठी सीए इंटरच्या निकालासोबतच संस्थेतर्फे टॉपर्सची यादी आणि गुणवत्ता यादी देखील जाहीर करणार आहे. महत्वाची माहिती यापूर्वी संस्थेने सीए इंटर जुलै २०२१ च्या परीक्षेचा निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर केला होता. जुलै सत्र परीक्षांमध्ये नवीन अभ्यासक्रमाच्या ग्रुप १ मध्ये ६० हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७,५६३ म्हणजेच २९.११ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रुप २ मध्ये ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी बसले आणि १००८२ म्हणजेच २२.२ टक्के उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाबद्दल बोलायचे तर, ग्रुप १ च्या परीक्षेत ८८७३ विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी केवळ ३८५ म्हणजेच ४.३४ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले होते. ग्रुप २ मध्ये २६ हजारांहून अधिक उमेदवार बसले होते आणि ७९६७ (३०.१३ टक्के) उत्तीर्ण झाले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Al5rYfd
via IFTTT

Post a Comment

0 Comments