Also visit www.atgnews.com
School Reopening: देशातील किती राज्यांमध्ये शाळा सुरु? शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती
School Reopening: देशभरातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर राज्यातील शाळांचे ऑफलाइन वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ११ राज्यांमध्ये शाळा पूर्णपणे सुरू आहेत. तसेच १६ राज्यांमध्ये उच्च वर्गांसाठी शाळा अंशतः उघडल्या आल्या आहेत. तर नऊ राज्यांमध्ये शाळांचे ऑफलाइन वर्ग अजूनही बंदच आहेत. शिक्षण मंत्रालयाने शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. सर्व राज्यांमध्ये किमान ९५ टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर काही राज्यांनी शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वीटी चांगसान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्यापक लसीकरण लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये राज्यांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पालकांच्या संमतीबाबत राज्यांनी निर्णय घेण्यास सांगण्यात आले. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शाळांमध्ये पूर्वी बंदी घालण्यात आलेल्या मिटींग आणि कार्यक्रमांबद्दल माहिती देण्यात आली आहे. नवीन सुचनेनुसार संबंधित राज्याने जाहीर केलेल्या एसओपीनुसार शाळा मिटींग आयोजित करू शकतात. ओडिशात ७ फेब्रुवारीपासून शाळा करोना रुग्णसंख्येमध्ये घट होऊ लागल्याने, ओडिशा सरकारने ७ फेब्रुवारीपासून राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव सुरेश चंद्र महापात्रा यांनी ३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. इयत्ता ८ वी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर टेक्निकल शैक्षणिक संस्था ७ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होतील. तसेच केजी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १४ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पंजाबमध्ये करोना रुग्णसंख्येची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने पंजाबमधील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची तारीख ८ फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. या तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कोचिंग क्लासेस आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र सध्या पश्चिम बंगालमध्ये प्राथमिक शाळा सुरू होणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी प्रशासकीय बैठकीत दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QYm1PfN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments