SEBI तर्फे ग्रेड ए अधिकारी फेज १ ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

Grade A Officer 2022: सेबीने (SEBI) ऑफिसर ग्रेड ए (सहाय्यक व्यवस्थापक) Assistant Manager Grad A Officer)भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India, SEBI) तर्फे जनरल (General), लीगल (Legal), आयटी (IT), रिसर्च (Research) आणि अधिकृत भाषा (official language) विभागांमधील ग्रेड ए ऑफिसर म्हणजेच असिस्टंट मॅनेजर पदांची भरती केली जात आहे. यासाठी पात्र उमेदवारांची निवड केली जात असून सेबीद्वारे ग्रेड ए ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. SEBI Grade A Admit Card 2022: असे करा डाउनलोड SEBI मध्ये ग्रेड ए अधिकारी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sebi.gov.in लिंकवर जा. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून डाउनलोड पेजवर जा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख प्रविष्ट करून सबमिट करा. उमेदवार स्क्रीनवर सेबी ग्रेड ए प्रवेशपत्र २०२२ दिसेल. प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. २० फेब्रुवारी रोजी होणार परीक्षा सहाय्यक व्यवस्थापक (अधिकारी ग्रेड A)(Assistant Manager Grad A Officer) पदांसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. SEBI द्वारे आयोजित या परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांना प्रवेशपत्राची गरज लागणार आहे. परीक्षाकेंद्रावर प्रवेशपत्र हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. सेबी ग्रेड ए प्रवेशपत्र २०२२ सोबत वैध फोटो आयडी न्यावा लागेल. या व्यतिरिक्त उमेदवारांना केवळ प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वस्तू बाळगण्याची परवानगी दिली जाईल. उमेदवारांनी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HlcCjhU
via IFTTT

Post a Comment

0 Comments