Also visit www.atgnews.com
विद्यार्थ्यांच्या 'आधार'मुळे शेकडो शिक्षक अतिरिक्त!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर 'सरल पोर्टलवरील आधार लिंकद्वारे नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर संचमान्यता करण्यात यावी, हे शासनाचे आदेश चुकीचे असून ते तातडीने रद्द करण्यात यावे. या आदेशामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. पोर्टलवर नोंदणी असलेले व शाळेत प्रत्यक्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी ग्राह्य धरण्यात येवून संचमान्यता करावी', अशी मागणी पुढे आली आहे. भाजप शिक्षक आघाडीच्यावतीने राज्याचे शिक्षणमंत्री, उपसचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना यासंदर्भात निवेदन पाठविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीच्या () आधारे यंदाची शिक्षक संचमान्यता करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या आदेशामुळे राज्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष शाळेत असलेले जास्त विद्यार्थी व चुकीच्या माहितीमुळे आधार लिंक झाले नसल्याने पोर्टलवर दिसत असलेले कमी विद्यार्थी अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी दहा टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित असूनही पोर्टलवर मात्र दिसत नाहीत. म्हणून मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करण्याबाबत ३१ मार्च २०२२पर्यंत शाळांना मुदतवाढ दिली आहे. ३१ मार्चअखेरपर्यंत आधार लिंक असलेलीच विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरून २०२१-२२ ची संचमान्यता करण्याचे आदेश शिक्षण उपसचिवांनी २८ फेब्रुवारी रोजी शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या नावात, आडनावात, जन्मतारखेत दुरुस्ती केल्यावरही पोर्टलवर विद्यार्थ्यांची नावे अपडेट होत नाहीत. माहितीत तफावत असल्याने हे विद्यार्थी संचमान्यतेमध्ये ग्राह्य धरता येणार नाहीत. मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांना या कामासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही. असलेल्या कार्डात अनेक चुका आहेत. राज्यात असे हजारो विद्यार्थी असल्याने व संचमान्यतेत हे विद्यार्थी धरले जात नसल्याने याचा गंभीर परिणाम शिक्षक अतिरिक्त ठरण्यावर होऊ शकतो. त्यामुळे संचमान्यतेबाबतचे सुधारित आदेश निर्गमित करून शिक्षकांवरील होणारा अन्याय तातडीने दूर करावा अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या डॉ.सौ कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके,अनिल शिवणकर, अनिल बोरनारे यांनी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KAZfX9V
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments