Also visit www.atgnews.com
Women’s Day: शाळा सोडलेल्या विद्यार्थिनींना शिक्षणात सामावून घेण्याचा निर्णय
2022: आज ८ मार्च २०२२ जगभरात आंतरराष्ट्रीय (international womens day) साजरा केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघातर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफ (UNICEF) यांनी एकत्र घेऊन केंद्रीय महिला आणि बाल विकास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Union Ministry of Women and Child Development) एक विशेष अभियान सुरु केले आहे. वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामाजिक कारणांमुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला या अभियानाची सुरुवात करण्यात आली. अनेक कारणांमुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. ही गळती भरुन काढण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शिक्षण सोडलेल्या मुलींना शाळेत परत आणण्यासाठी मंत्रालयाने 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील ११ ते १४ वयोगटातील शाळा सोडलेल्या मुलींना औपचारिक शिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' च्या माध्यमातून देशातील चार लाखांहून अधिक विद्यार्थिनींना मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बेटी बचाओ, बेटी पढाओ (BBBP), किशोरवयीन मुलांसाठी योजना (SAG) आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) च्या तरतुदींना एकत्र करुन मुलींना याचा फायदा करुन देण्यात येणार आहे. 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' मोहिमेचा शुभारंभ करताना, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, महिला आणि मुलींच्या शैक्षणिक सहाय्याची गरज आम्ही पूर्ण करत आहोत. महिलांमध्ये आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, आर्थिक साक्षरता यासह कौशल्ये विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. शिक्षण मंत्रालयाने गेल्या काही वर्षांपासून मुलींच्या नोंदणीला प्राधान्य दिले आहे. पण गेल्या दोन वर्षांत करोना प्रादुर्भावामुळे मुलींना माध्यमिक शिक्षणात प्रवेश घेणे आणि त्यांची पटसंख्या टिकवून ठेवणे आवश्यक बनले असल्याचे यावेळी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4ri9R0j
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments