Also visit www.atgnews.com
करोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन
म. टा. प्रतिनिधी, पुणे ''मुळे देशात '' घोषित झाल्याने, चालू शैक्षणिक वर्षात साधारण एक ते दीड महिन्याचा खंड पडला आहे. त्यामुळे येत्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षावर याचा प्रतिकूल परिणाम होणार असून, अकरावी प्रवेश, आरटीई प्रवेश, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आगमी शैक्षणिक वर्ष विस्कळित होणार आहे. राज्यात राज्य सामायिक प्रवेश कक्षाद्वारे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा आणि विविध विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. कृषी, अकृषी, अभिमत विद्यापीठांना आता १५ एप्रिलनंतर परीक्षांचे वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. त्यामुळे या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. या कारणाने यंदा शैक्षणिक वर्षाचा मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. दहावीचा आणखी एक पेपर उर्वरित असून, त्यानंतर निकाल लागणार आहे. त्याचा फटका अकरावी प्रवेशाला बसणार आहे. परीक्षाच वेळेवर होणार नसल्यामुळे पुढचे सर्व शैक्षणिक वर्षच विस्कळित होणार असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाठोपाठ राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या, तर १ एप्रिलपासून परीक्षा नियोजनानुसार घेण्यात येणार होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहणार असल्याची घोषणा केल्याने विद्यापीठांच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागणार आहेत. दर वर्षी मार्चमध्ये परीक्षा सुरू झाल्या, की त्या जूनपर्यंत सुरूच असतात. दर वर्षी उन्हाळी सत्रात विद्यापीठांमध्ये चार विद्याशाखांतून ३०० पेक्षा अधिक परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेसाठी दर वर्षी लाखो विद्यार्थी बसतात. आता या परीक्षा कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. त्यातच 'आरटीई'ची प्रवेशाची लॉटरी जाहीर झाली आहे. मात्र, लॉकडाउनमुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. 'करोना'ची परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आणखी निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठे परीक्षांचे वेळापत्रक तयार करत नाहीत. विद्यापीठांच्या परीक्षा सुमारे दोन महिने चालतात. परीक्षांनंतर निकाल जाहीर होण्यास साधारण ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे यंदा विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालाचा मोठा गोंधळ उडणार असून, याचा परिणाम प्रवेशप्रक्रियेवर होणार आहे. यातून आगामी शैक्षणिक वर्ष विस्कळित होण्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. एप्रिलअखेर परीक्षेचे नियोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांबाबत वातावरण निवळल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. विद्यापीठ प्रशासन एप्रिलच्या चौथ्या आठवड्यातील नियोजित परीक्षांवर आता लक्ष केंद्रित करत आहे. क्रेडिट बेस्ड चॉइस सिस्टीम आणि क्रेडिट ट्रान्सफरबाबत यूजीसी, राज्य सरकारच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 'सीईटी'चे नियोजन कोलमडणार सीईटी सेलने इंजिनीअरिंग, फार्मसी पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणार 'एमएचटी सीईटी' परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे ४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा लांबणीवर गेल्याने प्रथम वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कोलमडणार आहे. अभियांत्रिकी, कृषी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, विधी अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा लांबणीवर जाणार असल्याने, याचे निकाल जाहीर होण्यासोबतच या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यास जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे. जेईई पुढे ढकलण्यात आली असून, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जाणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होण्यास जुलै महिना उजाडू शकतो. परिणामी, या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष लांबणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2vUrlO6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments