Also visit www.atgnews.com
लॉकडाऊनमध्ये इंजिनीअरिंगचे धडे ऑनलाइन
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर हा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाने राबविलेल्या या मॉडेलचा वापर विद्यापीठांनीही त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी करावा, अशी सूचनाही नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मंत्र्यांनी केल्याचे समजते. २५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून कॉलेजेही बंद ठेवण्यात आली. शासन निर्णयानुसार शिक्षकांना 'वर्क फ्रॉम'चे निर्देश देण्यात आले होते. याचवेळी तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी आढावा घेतला, तेव्हा बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजे आणि तंत्रनिकेतनांमध्ये २० टक्के अभ्यासक्रम बाकी होता, असे निदर्शनास आले. हा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा यावर चर्चा झाली. तेव्हा ऑनलाइन माध्यमातून तो पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी सर्वप्रथम सर्व प्राचार्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. यात विविध विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइन कसा पूर्ण करता येईल याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यासाठी स्वयम, कोर्सएरा, एडएक्स यासारख्या साइटचा वापर करून त्यावरून ऑनलाइन मॉड्युल शोधण्यात आले. हे मॉड्युल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना झूम, गुगल क्लासरूम यांसारख्या अॅपच्या माध्यमातून थेट शिक्षण द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. यातून ऑनलाइन वर्ग भरविण्यात आले, असे डॉ. वाघ यांनी सांगितले. जे विद्यार्थी गावाला गेले आहेत, तेथे अनेकदा रेंजची अडचण येते. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन टीचिंग मॉडेलच्या लिंक शेअर करण्यास सांगण्यात आले. यातून थेअरीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला. मात्र प्रात्यक्षिक परीक्षांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार, असा प्रश्न होता. त्यावेळेस विविध व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध असाइनमेंट्स देण्यात आल्या. हे शिकवण्यासाठी प्राध्यापकांनी स्क्रीन-ओ-मॅटिक सारख्या ऑनलाइन व्हिडीओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून छोटे छोटे व्हिडीओ तयार केले आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले, असे डॉ. वाघ यांनी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार हे ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल तयार करण्यात आले. यात कोणताही पैसा खर्च न करता हे मॉडेल तयार झाले. तसेच त्यात पारदर्शकता आणून शिक्षकांचे मूल्यमापनही करण्यात आले. अशी आणली पारदर्शकता इंजिनीअरिंग कॉलेजे आणि तंत्रनिकेतनांमधील शिक्षकीय पदांना सातवा वेतन आयोग लागू करताना शासनाने शिक्षकाची कामगिरी तपासण्यासाठी ३६० डिग्री फीडबॅक संकल्पना अनिवार्य केली आहे. या अनुषंगाने शिक्षक वर्गाचे वार्षिक गोपनीय अहवाल, आणि '३६० डिग्री फीडबॅक' या बाबींचे मूल्यमापन करताना त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' अंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यमापन समाविष्ट असेल. यासाठी विशेष वेबसाइट तयार करून शिक्षकांना त्यावर सर्व तपशील भरण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानुसार त्याचे मूल्यमापनही करण्यात येणार असल्याचे डॉ. वाघ म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UOveh8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments