Also visit www.atgnews.com
विद्यापीठांच्या परीक्षा १५ मे पर्यंत नाहीच?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी सामायिक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठांच्या परीक्षा १५ मेपर्यंत होणार नसल्याचे संकेत देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. विद्यापीठांनी आपल्या आकस्मिक निधीचा वापर परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, मास्क व सॅनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. व्हर्च्युअल क्लासरूम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाइन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. प्रत्येक विद्यापीठाने आपल्या परिसरात स्थलांतरित कामगार, बेघर व निराश्रित लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, तसेच विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपल्या वेतनाचा काही भाग सरकारला योगदान म्हणून देता येईल का याचा विचार करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VaHCaj
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments