जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं गरीबांसाठी कम्युनिटी किचन

करोना व्हायरसमुळे देशावर संकट आले आहे. देश स्थितीत आहे. गरीबांच्या पोटावर पाय आला आहे. देशात चहूकडून मदतीचा ओघही वाढत आहे. पंतप्रधान मदत निधीत देशातले दिग्गज उद्योगपती, सेलिब्रिटी, सर्वसामान्य जनताही यथाशक्ती मदत करत आहे. देशात अनेक ठिकाणी गरजूंना जेवण, रेशन दिलं जात आहे. याच कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. या विद्यापीठातले विद्यार्थी गरीबांच्या मदतीला धावून आले आहेत. जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने बेरोजगारी आणि उपासमारीची पाळी आलेल्या सुमारे २०० लोकांसाठी दररोज जेवण देण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी त्यांनी विद्यापीठातच स्वयंपाक बनवायला सुरूवात केली आहे. विद्यापीठातील एक विद्यार्थी अविकने सांगितलं की शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयापीठ प्रशासनाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका कोपऱ्यात हे स्वयंपाकघर सुरू झालं आहे. त्यात खिचडी शिजवली जाते. रोज सुमारे दोन हजार रुपये खर्च येतो. विज्ञान विभागाचे विद्यार्थी प्राध्यापकांच्या देखरेखीखाली हँड सॅनिटायझरही बनवतात. यासाठी विद्यार्थी लोकांकडून पैसे गोळा करतात आणि त्याचा हिशेबही ठेवतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UEip8Z
via IFTTT

Post a Comment

0 Comments