Also visit www.atgnews.com
कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ
ने करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या आणि देशभरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेची मुदत वाढवली आहे. याआधीही एकदा या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. ही परीक्षा यावर्षी जूनमध्ये होणार आहे. आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. आता उमेदवार या परीक्षेसाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलंय की केंद्र आणि राज्य सरकारांनी करोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी विविध निर्बंध लादले आहेत आणि यामुळे सीएस परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. जून २०२० सत्राच्या शेड्युलमध्ये कोणताही बदलाव झालेला नाही. परीक्षा १ जून २०२० पासूनच होणार आहे. दरम्यान, सीएस कार्यकारी प्रवेश परीक्षा CSEET साठी नोंदणी ५ मे रोजी संपेल. ICSI द्वारे आयोजित करण्यात येणारी ही पहिली CSEET आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत २५ मार्च होती ती आता १५ एप्रिल करण्यात आली आहे. अधिक माहिती आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RopMjd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments