ऑनलाइन परीक्षांसाठी समितीने सुचवले ३ मॉडेल

केंद्र सरकारने ऑनलाइन शिक्षणाच्या सर्वंकष धोरणाबाबत तज्ज्ञांची एक समिती गठित केली आहे. इग्नूचे कुलगुरू नागेश्वर राव या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीतने ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आपल्या शिफारशी सरकारला सुपूर्द केल्या आहेत. यात ऑनलाइन परीक्षांसाठी तीन मॉडेलही देण्यात आले आहेत. समितीच्या अहवालाच्या आधारावर विद्यापीठ अनुदान आयोग पुढील आठवड्यापासून परीक्षांसंदर्भातले निर्देश जारी करेल. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार समितीने अनिवार्य करण्यासंबंधी शिफारशी दिल्या आहेत. हे तीन मॉडेल कुठले जाणून घेऊ... मॉडेल १ यात वस्तूनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल. समितीने असे सुचवले आहे की शिक्षक 'क्विझ असाइनमेंट' पर्यायाचा वापर करुन गुगल क्लासरूम अॅपवर प्रश्न अपलोड करतील. अहवालानुसार परीक्षा दीड तासांची असावी आणि बॅचमध्ये ३० उमेदवार असावेत. विद्यार्थी परीक्षेमध्ये गुगल मीटच्या माध्यमातून बसतील. ते कॅमेरा आणि ऑडिओच्या मदतीने Google मीटशी जोडलेले असतील. गुगल क्लासरूमच्या मदतीने ते प्रश्न पाहू शकतील. त्यांना त्यांचे उत्तर एका साध्या कागदावर लिहावे आणि निर्धारित वेळेपूर्वी ते अपलोड करावे लागेल. गुगल मीटद्वारे परीक्षक विद्यार्थ्यांचे परीक्षण करतील. ते विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची नोंद घेतील. एखाद्या विद्यार्थ्याला कॉपी किंवा अन्य गैरमार्गाचा वापर केल्याबद्दल पकडल्यास त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. अहवालात असे म्हटले आहे की परीक्षा नियंत्रक / पर्यवेक्षकही गुगल मीटमध्ये सामील होऊन विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवू शकतात. शिक्षकांनी अपलोड केलेल्या उत्तरपुस्तकांचे हाती मूल्यांकन करावे लागेल. मॉडेल २ ऑनलाईन प्रॉक्टर सेवेमार्फत एमसीक्यू चाचणी घेण्यात यावी अशी सूचना समितीने केली आहे. जीमॅट आणि जीआरई परीक्षा ऑनलाईन प्रॉक्टर सेवेद्वारे घेण्यात येतात. लॉगिनसाठी विद्यार्थ्यांना पासवर्ड आणि युजर आयडी मिळेल. एक वेब लिंक देखील उपलब्ध करून दिली जाईल ज्याच्या मदतीने ते परीक्षा देऊ शकतील. या माध्यमातून, प्रॉक्टर विद्यार्थ्याला मध्येच थांबवू शकतो आणि त्याच्या खोलीचे 360 डिग्री व्ह्यू दर्शविण्यास सांगू शकतो. मॉडेल ३ हे मॉडेल केस स्टडी आणि प्रोजेक्टवर आधारित आहे. विद्यार्थ्यांना पेपर सादर करण्याच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधी एक प्रॉब्लेम (प्रश्न) दिला जाईल आणि हाताने लिहून त्यांचे निराकरण करण्यास सांगितले जाईल. अहवालानुसार लेखी उत्तर सादर केल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्राध्यापक विद्यार्थ्यांना गुगल मीटद्वारे ऑनलाइन प्रेझेंटेशन देण्यास सांगतील किंवा विद्यार्थ्याला ऑनलाइन वायवा मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KBqpls
via IFTTT

Post a Comment

0 Comments