'नीट पीजी'ची गुणवत्ता यादी जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या सामायिक प्रवेश परीक्षेची पहिली तात्पुरती राज्य सीईटी सेल मंगळवारी जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीतील रँकमध्ये राघवेंद्र पंडित हा राज्यातून पहिला आला असून, त्याचा नीट पीजीचा एकूण स्कोअर १००२ इतका आहे. तर यश शर्मा हा या रँकमध्ये दुसरा आला असून, त्याचा स्कोअर ९६९ आहे. मुलींमध्ये अंकिता राणी ही राज्यात पहिली असून तिचा ९३० इतका स्कोअर आहे. राज्य सीईटी सेलने वैद्यकीय प्रवेशाची पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या यादीत खुल्या प्रवर्गासह इतर राखीव प्रवर्गातील एकूण ५५९२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवर्ग आणि नावासह सीईटी सेलने यादी जाहीर केली आहे. यासोबतच मंगळवारी नीट-एमडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यात राज्यात दीपक महाजन याने पहिल्या (१२) रँकमध्ये येण्याचा मान पटकावला आहे. त्याचा एमडीएस स्कोअर ७४६ इतका आहे.तर दुसऱ्या स्थानावर फैयाज पारधीवाला आला असून, त्याचा रँक १३ असून, स्कोअर ७४३ आहे. तर नीट-एमडीएसमध्ये मुलींमध्ये राज्यात प्रियांका रेलन पहिली असून, तिचा स्कोअर ७२४ इतका आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XzJ7Sg
via IFTTT

Post a Comment

0 Comments