डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणवंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. - मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केले तेही तितकेच मूलगामी स्वरूपाचे आहे. ज्ञानाअभावी व्यक्ती ‌आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय; अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. - बाबासाहेबांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता. - सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे, असे डॉ. आंबेडकरांनी एका सभेत म्हटले होते. - बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व भारत सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ३ लाख रुपयांचा निधी मिळविला होता. परिणामी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली होती. - शिक्षक हा शालेय असो, महाविद्यालयीन असो की विद्यापीठीय असो त्याचे कर्तृत्त्व उत्तुंग आणि विद्यार्थ्यांना अनुकरणीय वाटले पाहिजे, असे ते शिक्षकांविषयी बोलत. - बाबासाहेबांनी शिक्षणाचा पायाभूत विचार करताना ज्यांना ‌शिक्षणाचे महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी सक्तीचा कायदा असावा असे म्हटले. शिवाय शिक्षण सरसकट सर्वांसाठी मोफत न करता जे फी देऊ शकतात त्यांच्याकडून ती घ्यावी म्हणजे सक्तीच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यास मदत होईल, असेही त्यांचे मत होते. - शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34ybQZ6
via IFTTT

Post a Comment

0 Comments