Also visit www.atgnews.com
कला शाखेनंतर करिअरचे उत्तम पर्याय
कला शाखेतून शिक्षण घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांना चांगलं करण्याची संधी आहे. बर्याच वेळा आर्ट्सचे विद्यार्थी इतर शाखांच्या विद्यार्थ्यांपेक्षा स्वतःला कमी लेखतात. परंतु आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी योग्य कोर्स निवडल्यास त्यांना चांगली नोकरी मिळू शकते आणि चांगले करिअर बनू शकते. आम्ही येथे तुम्हाला कला शाखेतील करिअरची माहिती देत आहोत. या क्षेत्रात बनवा करिअर - वकील - कला शाखेचे विद्यार्थी पदवीनंतर शिक्षण कायद्याचा अभ्यास करतात. एलएलबी अभ्यासक्रम देशातील अनेक बड्या विद्यापीठांमार्फत घेण्यात येतात आणि या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सहसा प्रवेश परीक्षा घेतली जाते. आपण CLAT परीक्षेची तयारी करू शकता, त्यानंतर तुम्हाला देशातील विधी अभ्यासक्रमांच्या टॉप महाविद्यालयात प्रवेश मिळेल. फॅशन आणि टेक्सटाईल डिझाइन - जर तुम्हाला या क्षेत्रात रस असेल तर तुम्ही दोन वर्षांचा पीजी कोर्स करू शकता. यात १ वर्षाचा डिप्लोमा आणि २ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. कोर्सबाबत प्रत्येक संस्थेचे अभ्यासक्रमाबाबत स्वतःचे वेगळा निकष आहेत. शिक्षक - हे असे क्षेत्र आहे जे बर्याच कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असते. यासाठी बीएड कोर्समध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा एमए केल्यानंतर नेट परीक्षा पास करावी लागेल. बीएड केल्यावर तुम्ही शाळांमध्ये शिकवू शकता, नेट पास झाल्यावर तुम्ही महाविद्यालयात शिक्षक पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असाल. हॉटेल व्यवस्थापन - हॉटेल उद्योगात केवळ देशातच नव्हे तर परदेशातही स्कोप कायम असतो. हॉटेल उद्योगाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आर्ट्स ग्रॅज्युएट करू शकतात. या अभ्यासक्रमाचा प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वेगळा निकष असतो. या क्षेत्रात तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेन्ट, एमबीए इन टूरिझम इत्यादी अभ्यासक्रम करू शकता. सरकारी नोकरीची तयारी - प्रत्येकाला सरकार नोकरी हवी असते आणि आपण यूपीएससी किंवा एसएससी (स्टाफ सिलेक्शन कमिशन) नोकरीसाठी अर्ज करू शकता किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेच्या नोकरीसाठी तयारी करू शकता. जर तांत्रिक आणि विशेष क्षेत्रातील नोकऱ्या वगळल्या तर बहुतेक सरकारी नोक ऱ्यांमध्ये कोणत्याही विषयातील पदवी पात्र ठरते. या व्यतिरिक्त इतर फील्ड आणि अभ्यासक्रम देखील लोकप्रिय आहेत - पत्रकारिता अॅनिमेशन विदेशी भाषा तज्ञ एमबीए इव्हेंट मॅनेजमेंट रिटेल आणि फॅशन मर्चंडाइज ग्राफिक डिझाइनर शेअर मार्केट
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VzYlVT
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments