MPSC Main 2019 परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC DYCA Group A Exam Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ या कालावधीथ घेण्यात आली होती. सातारा येथील प्रसाद बसवेश्वर चौगुले हा उमेदवार राज्यातून सर्वसाधारण वर्गातून प्रथम आला आहे, तर उस्मानाबाद येथील रवींद्र आपदेव शेळके याने मागासवर्गीयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अमरावतीतील पर्वणी रवींद्र पाटील मुलींमधून प्रथम आली आहे. मेन्स देणाऱ्या ६,८२५ उमेदवारांपैकी १,३२६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. संपूर्ण निकाल आयोगाच्या या संकेतस्थळावर पाहता येईल. विस्तृत निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवर्गनिहाय शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण म्हणजेच कट ऑफ गुणही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१९ १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ३,६०,९९० उमेदवार बसले होते. यातून ६,८२५ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ या कालावधीत मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे येथे घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी १,३२६ उमेदवार पात्र ठरले आहेत. ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, अशा उमेदवारांनी आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबतची अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fJCiTN
via IFTTT

Post a Comment

0 Comments