यूपीएससीत महिलांचा टक्का वाढला

म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत यावर्षी महिलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. यूपीएससी नागरी सेवा अंतिम निकाल २०१९ नुसार एकूण ८२९ उमेदवार यशस्वी ठरले, यापैकी १९७ महिला आहेत. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माहिती दिली. २०१८ च्या तुलने २०१९ मध्ये यशस्वी महिला उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) या मुख्य सेवांसह अन्य नागरी सेवांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. २०१९ मध्ये यशस्वी ८२९ उमेदवारांपैकी ६३२ पुरुष तर १९७ महिला आहेत. यूपीएससी २०१९ चा निकाल मंगळवारी ४ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर झाला. या परीक्षेत आयआरएस अधिकारी प्रदीप सिंह यांनी अव्वल क्रमांक पटकावला तर प्रतिभा वर्मा या महिला उमेदवाराने तिसरं स्थान पटकावलं. जतिन किशोर यांना दुसरं स्थान मिळालं. २०१८ च्या परीक्षेत ७५९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यापैकी ५७७ पुरुष तर १८२ महिला होत्या. 'सरकार महिलांचं या परीक्षेतील प्रमाण वाढून लैंगिक समतोल राखण्यासाठी प्रयत्न करत असते आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्याला प्रेरित करत असते,' अशी माहिती आयोगाच्या अधिसूचनेत दिलेली असते. सिव्हील सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यात आयोजित केली जाते. यात पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखीतचा समावेश असतो. यात निवड झालेले उमेदवार प्रतिष्ठित लोक सेवांमध्ये आपले योगदान देतात. यावर्षी या नागरी सेवांसाठी निवड झालेल्या ८२९ उमेदवारांपैकी ३०४ सर्वसामान्य प्रवर्गातील, ७८ आर्थिक वंचित गटातील, २५१ ओबीसी, १२९ अनुसूचित जाती तर ६७ अनुसूचित जमातीतील उमेदवार आहेत. १८२ उमेदवारांना आरक्षित यादीत (रिझर्व्ह) ठेवले गेले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2DprVan
via IFTTT

Post a Comment

0 Comments