Also visit www.atgnews.com
CLAT 2020: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट पुन्हा लांबणीवर
examination: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT 2020) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, बंगळुरूने २२ ऑगस्ट २०२० रोजी होणारी परीक्षा तूर्त तरी स्थगित केली आहे. यापूर्वी ही परीक्षा १० मे रोजी होणार होती. तेव्हाही ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोविड - १९ महामारी संक्रमण स्थिती सामान्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा कधी केली जाणार हे आयोजक संस्थेने नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात असं म्हटलं आहे की परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा १ सप्टेंबर रोजी केली जाईल. विद्यार्थी consortiumofnlus.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर नवं वेळापत्रक १ सप्टेंबर नंतर पाहू शकतील. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. CLAT 2020 परीक्षा देशभरातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्री स्तरावरील या परीक्षेती मेरिटच्या आधारे नॅशनल लॉ युनिवर्सिटीत बॅचलर आणि मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा देशभरात २०३ ठिकाणी आयोजित केली जाते. यंदा कोविड - १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दूरवर जाऊ लागू नये म्हणून जवळचे केंद्र दिले जाण्याचा प्रयत्न संस्था करत आहेत. कोविड-१९ संसर्गाची स्थिती सामान्य होत नसल्याने ही परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. सामान्यत: ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2C0zsvw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments