Also visit www.atgnews.com
जेईई अॅडव्हान्स्ड २०२०: कसा होता पेपर?
IIT question : आयआयटी दिल्लीने जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अॅडव्हान्स्ड (JEE Advanced 2020) चे आयोजन रविवारी २७ सप्टेंबर २०२० रोजी केले होते. देशभरात विविध केंद्रांवर दोन सत्रात परीक्षा झाली. पहिल्या शिफ्टमध्ये पेपर १ ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत झाली. दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पेपर २ ची परीक्षा झाली. या वर्षी जेईई मेनमध्ये यशस्वी झालेल्या सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्ड साठी नोंदणी केली होती. आयआयटी दिल्लीने सांगितले की यापैकी सुमारे ९६ टक्के विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली. JEE Advanced Paper 1 pattern: क्वेश्चन पेपरवर एक नजर परीक्षा पद्धती - ऑनलाइन एकूण गुण - १९८ (मागील वर्षी १८६ गुणांसाठी परीक्षा झाली होती) एकूण प्रश्न - ५४ (२०१९ मध्ये देखील ५४ प्रश्नच विचारण्यात आले होते) एक विभाग किती गुणांचा - ६६ (एकूण तीन विभाग - फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) प्रत्येक विभागात तीन सेक्शन होते. प्रत्येक सेक्शनमध्ये किती प्रश्न विचारले गेले आणि गुण कसे होते :- सेक्शन १ - (एकूण प्रश्न - ६, गुण - १८) प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय होते, त्यापैकी एक योग्य उत्तर होते. योग्य उत्तरासाठी ३ गुण होते, अयोग्य उत्तरासाठी एक गुण वजा होणार आहे. सेक्शन २ (एकूण प्रश्न - ६, एकूण गुण - २४) प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांचे चार पर्याय होते. एकापेक्षा अधिक पर्याय योग्य होते. सर्व योग्य पर्याय निवडायचे होते. सर्व योग्य पर्याय निवडल्या चार गुण मिळतील. जर चार पर्याय योग्य असतील आणि तुम्ही तीनच निवडले असतील तर तीन गुण मिळतील. जितके योग्य पर्याय निवडले असतील तेवढेच गुण दिले जातील. अयोग्य उत्तराला एक गुण वजा होईल. सेक्शन ३ (एकूण प्रश्न - ६, एकूण गुण - २४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला न्युमरिकल व्हॅल्यू होती. योग्य पर्याय निवडल्यास ४ गुण मिळतील. यात नकारात्मक मूल्यांकन नव्हते. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की जेईई अॅडव्हान्स्ड पेपर मधील प्रश्नांचे स्वरुप मागील वर्षीच्या तुलनेत सोपे होते. मात्र पेपर सोपा नव्हता. काठिण्य पातळी मध्यम ते कठीण होती. विद्यार्थ्यांना केमिस्ट्री सोपा, फिजिक्स मध्यम आणि गणित अन्य दोनच्या तुलनेत कठीण वाटला. कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले होते? फिजिक्स - जवळपास सर्व प्रश्न ११ वी, १२ वीच्या अभ्यासक्रमातून विचारले होते. रोटेशन, वर्क पावर, एनर्जी, मॅग्नेटिझम आमि थर्मोडायनॅमिक्स या विषयांवरील जास्त प्रश्न होते. केमिस्ट्री - इनॉर्गेनिक आणि फिजिकल केमिस्ट्रीवर ऑर्गेनिकपेक्षा अधिक प्रश्न होते. मॅथ्स - ५ ते ६ प्रश्न कॅलक्युलसवरील होते. त्याव्यतिरिक्त कंटीन्यूइटी अँड डिफरन्शिएबिलिटी, अॅप्लिकेशन ऑफ डेरिव्हिटिव्ह, डेफिनिट इंटिग्रल्स या विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले होते. प्रॉबेबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर्स, डिटर्मिनंट्समधून एकेक प्रश्न आणि ३ डी ज्योमेट्रीमधून २ प्रश्न विचारण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/336NhTW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments