RTE अंतर्गत प्रवेश दिला आणि शाळा बंद झाली; 'त्या' २३ मुलांच्या प्रवेशाचे काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातील बावधन येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल बंद केल्यानंतर शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) तेथे प्रवेश घेतलेल्या २३ विद्यार्थ्यांना अजूनही दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळत नसल्याने, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांना तातडीने जवळच्या शाळेत प्रवेश देऊन, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून थांबवावे, अशी मागणी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे करण्यात आली आहे. पालकांना कोणतीही पूर्व सूचना न देता ऑक्सफर्ड इंटरनॅशनल पब्लिक स्कूल बंद करण्यात आली. ही शाळा बंद करताना मुलांना नऱ्हे आणि ताथवडेच्या शाळेत प्रवेश देण्याचा पर्याय दिला होता. मात्र, १० ते १५ किलोमीटर अंतरावरील हा पर्याय आर्थिक व व्यावहारिक दृष्ट्या चुकीचा असल्यामुळे त्या शाळेतील आरटीईच्या ३९ मुलांचे इतर शाळेतील प्रवेशाचे प्रश्‍न निर्माण झाले होते. याबाबतची तक्रार समाजवादी शिक्षण हक्‍क सभेने महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे केली होती. त्यानंतर संघटनेने शिक्षण विभागाशी चर्चा केल्यानंतर, १० मार्च रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना मुलांची वर्गवार यादी व परिसरातील शाळांच्या पर्यायाची यादी दिली होती; तसेच पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारानंतर ७ ऑगस्ट रोजी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात सर्व संबंधितांची बैठक झाली. त्यानंतर १७ ऑगस्टला आरटीईच्या मुलांना शाळा देण्यात आल्या. पालकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियेनुसार १५ मुलांच्या प्रवेशाचा प्रश्‍न सुटला आहे. मात्र, २४ मुलांचा प्रश्‍न शिल्लक आहे. शिक्षण विभागाने पर्याय म्हणून मुलांना दिलेल्या दोन शाळा अंतराने दूर होत्या. त्यामुळे शिक्षण हक्क सभेने २७ ऑगस्ट रोजी तसे पत्र शिक्षण विभागाला दिले होते; तसेच १५ मुलांना प्रवेशासाठी बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा पर्याय दिला होता. मात्र, त्या शाळेनी जागा शिल्लक नाही, असे कारण सांगून मुलांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे एकूण २३ मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्‍न शिल्लक आहे. त्यामुळे स्पेशल केस म्हणून या मुलांचा जवळच्या शाळेमध्ये समावेश करुन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेने केली आहे. आरटीईतून प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या समस्येबाबत वेळोवेळी तक्रार करूनही शिक्षण खाते या प्रश्‍नाकडे गांभीर्याने बघत नाही. त्याचप्रमाणे अचानकपणे बंद करण्यात आलेल्या शाळेवर कारवाईही करत नाही. शिक्षण खात्याचा हा सुस्तपणा निषेधार्ह आहे. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता व निराशा वाढली आहे. ही सर्व परीस्थिती बघता शिक्षण हक्‍क सभा आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहे, अशी माहिती सभेचे संघटक प्रा.शरद जावडेकर आणि २५ टक्के आरक्षण पालक संघाच्या सुरेखा खरे यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EE3giU
via IFTTT

Post a Comment

0 Comments