Also visit www.atgnews.com
यूपीएससी सीएपीएफ भरती: मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर
interview: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) CAPF 2019-20 साठी मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या तारखांचा तपशील देण्यात आला आहे. तसेच ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांचा तपशीलहे देण्यात आला आहे. या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. या मुलाखती ऑफलाइन होणार आहेत. CAPF मुलाखती १६ ते २० नोव्हेंबर आणि २२ ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दर दिवशी दोन सत्रात होणार आहेत. मुलाखतींसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात उपस्थित राहायचे आहे. मुख्यालयाचा पत्ता आहे - केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शहाजहाँ रोड, नवी दिल्ली. मुलाखतीचे कॉल लेटर २३ ऑक्टोबर रोजी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. जे वैद्यकीयदृष्ट्या फीट असलेल्या उमेदवारांनाच हे पत्र दिले जाईल. उमेदवारांना आपल्यासोबत जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत घेऊन जायचे आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार आहे. कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उमेदवारांना पालन करायचे आहे. प्रत्येक उमेदवाराला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. प्रत्येक वेळी आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेकडे लक्ष द्यायचे आहे. उमेदवारांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. जर कोणी उमेदवार कोविड-१९ संक्रमित असेल तर त्याने यूपीएससीला तसे सूचित करायचे आहे. उमेदवार यासंबंधीची माहिती soe23-upsc@gov.in या मेलवर पाठवू शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35kB6mA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments