IBPS SO भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरायला सुरूवात

SO Recruitment 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने सोमवार २ नोव्हेंबरपासून स्पेशालिस्ट ऑफिस केडर पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर वर ऑनलाइन अर्ज भरावेत. साठी अर्ज भरण्याची अखेरची मुदत २३ नोव्हेंबर २०२० आहे. आयबीपीएस ही भरती प्रक्रिया पुढील पदांवरील नियुक्त्यांसाठी राबवत आहे - आय टी ऑफिसर (स्केल १) अॅग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल १) राज्यसभा अधिकारी (स्केल १) लॉ अधिकारी (स्केल १) एच आर ऑफिसर (स्केल १) मार्केटिंग ऑफिसर (स्केल १) योग्य उमेदवारांनी कॉमन रिक्रुटमेंट प्रक्रियेत नोंदणी करायची आहे. परीक्षा टू टीअर असेल, म्हणजेच पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यात परीक्षा होईल. दोन्ही परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा यशस्वीपणे देणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावते जाईल. मुलाखत सहभागी संस्थेतर्फे घेण्यात येईल तर नोडल बँक त्यांचा समन्वय करेल. महत्त्वाच्या तारखा - ऑनलाइन नोंदणी - २ नोव्हेंबर २०२० अर्ज करण्याची अंतिम मुदत - २३ नोव्हेंबर २०२० अर्जात दुरुस्ती करण्याची अखेरची मुदत - २३ नोव्हेंबर २०२० अर्जात बदल करण्याची मुदत - २३ नोव्हेंबर २०२० ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत - २ नोव्हेंरब २०२० ते २३ नोव्हेंबर २०२०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2GiZ4pE
via IFTTT

Post a Comment

0 Comments