द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई डिप्लोमानंतर इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. यासाठी १० टक्के जागा राखीव असतात. यात डिप्लोमानंतर इंजिनीअरिंग पदवी घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. ही प्रवेश प्रक्रिया ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यंदा इंजिनीअरिंगचे द्वितीय वर्षाचे वर्गही सुरू झाले, विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले तरीही या प्रवेशाबाबत कोणतीही सूचना जाहीर करण्यात आलेली नव्हती. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर युवा सेनेनेही याची दखल घेऊन विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्याबाबत मागणी केली होती. यानंतर गुरुवारी रात्री उशीरा हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जागा जाहीर करणे - ११ डिसेंबर विद्यार्थ्यांचा पसंती क्रम भरण व निश्चित करणे - १२ ते १४ डिसेंबर पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप - १६ डिसेंबर कॅपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे - १७ व १८ डिसेंबर कागदपत्र सादर करून प्रवेश घेणे - १७ ते १९ डिसेंबर दुसरी प्रवेश फेरीसाठी जागा जाहीर करणे - २० डिसेंबर विद्यार्थ्यांचा पसंती क्रम भरण व निश्चित करणे - २१ ते २२ डिसेंबर दुसऱ्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप - २४ डिसेंबर कॅपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे - २५ व २८ डिसेंबर कागदपत्र सादर करून प्रवेश घेणे - २५ ते २९ डिसेंबर


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36CyDpu
via IFTTT

Post a Comment

0 Comments