Also visit www.atgnews.com
Schools Reopening: शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली
म. टा. प्रतिनिधी, पुणे इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू केल्यानंतर, गेल्या दहा दिवसांत सुरू झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक शाळा सुरू झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुनही याबाबत माहिती दिली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा जूनमध्ये सुरू करण्यात आल्या नाहीत. त्याचप्रमाणे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देऊन संसर्ग कमी असलेल्या ठिकाणी शिक्षक गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या लहान समूहांना शिकवत होते. मात्र, दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली. त्यानुसार २३ नोव्हेंबरला राज्यातील २५ जिल्ह्यांतील ९ हजार १२७ शाळा सुरू झाल्या, तर २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थी उपस्थित होते. करोनाच्या शक्यतेमुळे विद्याथ शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये भीती असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता वातावरण काही प्रमाणात निवळत असल्याचे चित्र असून, गेल्या दहा दिवसांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढल्याचे २ डिसेंबरच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ९१ हजार ९६२ झाली आहे. तर २ हजार १९५ शाळा-कनिष्ठ महाविद्यालये वाढून सुरू झालेल्या शाळा-ज्युनिअर कॉलेजांची संख्या ११ हजार ३२२ झाली आहे, अशी शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. गडचिरोलीतील ९८ टक्के शाळा सुरू राज्यात सर्वाधिक शाळा सुरू झालेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्हा आघाडीवर आहे. गडचिरोलीतील जवळपास ९८ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. तर, सोलापूरमध्ये ९५ टक्के शाळा सुरू झाल्या असून, या शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के आहे. करोना संसर्गामुळे काही ठिकाणी २३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आकडेवारीमध्ये वर्धा, जळगाव, ठाणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई या जिल्ह्यांची माहिती उपलब्ध नाही. राज्याची एकूण आकडेवारी राज्यात नववी ते बारावीच्या एकूण शाळा - २२२०४ एकूण विद्यार्थी संख्या - ५६४८०२८ शिक्षक संख्या - २२७७७५ शिक्षकेतर कर्मचारी - ९२३४३
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lJtxMs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments